आज दि पंचवीस ऑगस्ट रोजी सांय पाच वाजता माहिती मिळाली कि कन्नड तालुक्यातील दिगाव येथे झालेल्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी गणपत सुसुंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वाघ आणि शकील सय्यद खेडी यांची निवड करण्यात आली गावातील वाद विवाद गावातच मिटवून शांतता राखण्यासाठी ही निवड सर्वानुमते करण्यात आली. या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.