वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे यामुळे अपघात घडत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका मुख्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिशन खड्डे मुक्त आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली, रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.