गेल्या काही दिवसापासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे आनंदवाडी-सुनेगाव जोड रस्त्यावरील मन्याड नदीवरील पूल वाहून गेला आहे. यामुळे या गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे मॅडम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित उपअभियंत्यांना रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.