मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. जरांगे पाटलांसोबत हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहे. मात्र या आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच मी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.