आज दिनांक ३० ऑगस्ट २०२५ वेळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुंबई महानगरपालिकेतून आझाद मैदान येथे मराठा आंदोलकांसाठी पालिकेचे एक आरोग्य पथक कार्यरत ठेवण्यात आले असून नायर रुग्णालय तसेच ए विभाग पालिका यांच्या वतीने हे आरोग्यपक सध्या या ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिके कडून देण्यात आली आहे.