29 ऑगस्टला दुपारी तीन वाजता च्या सुमारास पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील भारत माता चौक येथे दोन दुचाकींची अमोरासमोर धडक झाली जात एकाच्या जागीच मृत्यू झाला. मृतक व्यक्तीचे नाव माणिक मुकसावर वय 65 वर्ष असे सांगण्यात आले आहे. तर यामध्ये दुसरा दुचाकी चालक राकेश मुल्लेवार व माणिक यांची पत्नी लक्ष्मी जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राकेश हा त्याच्या पल्सर दुचाकीने सावनेर कडून नागपूरच्या दिशेने जात होता दरम्यान समोरून येणाऱ्या माणिक यांच्या दुचाकीला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक लागली.