मुंबईकरांच्या आरोग्याकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, सणासुदीच्या काळात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, लेप्टो आणि हिपॅटायटिससारखे आजार वेगाने पसरत आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळणारे हे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असे म्हणत शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अँड. अमोल मातेले यांनी पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ही प्रतिक्रिया आज बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास देण्यात आली.