उदगीर शहरात अप्पाराव पाटील कौळखेडकर चौकात एसटी बस चालकांस दोघांनी मारहाण केल्याची घटना १९ मे रोजी सांयकाळी पाच वाजता घडली आहे,मारहाण करून पळून जाणाऱ्या व्यक्तीला अवघ्या २० मिनिटात ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,देगलूर कडून उदगीरकडे येणारी देगलूर आगाराची एसटी बस क्रमांक एम एच २० बीएल १७९८ च्या चालकांना तू कट का मारलास म्हणून एम एच ४६ एआर ७६९७ च्या चालकाने व अन्य एका साथीदाराने मिळून एसटी बस चालकांस बेदम मारहाण केली.