राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. खावडा फोर सी पावर ट्रान्समिशन लिमिटेड च्या पारीक्षण वाहिनीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. बाधित शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.