एक वायरल होत असलेला व्हिडिओ हाती आलेला आहे. जिथे एकीकडे अपघात कमी होण्यासाठी वाहतूक पोलीस विविध उपायोजना करीत आहे तिथे दुसरीकडे मात्र युवक वाहतुकीचे नियम जाणून बुजून मोडत आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे हा व्हिडिओ सहा सप्टेंबरच्या रात्रीचा सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये नागपूर शहरातील सुप्रसिद्ध रामझूल्यावर एक युवक स्टंट करताना दिसत आहे तो चक्क दुचाकीवर झोपून दुचाकी चालवत आहे.