राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज बुधवार दिनांक 24/09/2025 रोजी दिवसभरात विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. सदर मोहिमेदरम्यान 35 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली त्या वाहनांवर 18,500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.