पनवेल महानगरपालिकेतर्फे सध्या मोबाईल टॉवर्स मोकळ्या जागेमध्ये बसवण्याचे जे काम सुरू आहे त्या संदर्भात महापालिकेकडून काही चुकीचे लोकेशन्स आणि काही महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष होत आहे असे दिसत होते. आज शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव श्रुती म्हात्रे यांनी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या सोबत जाऊन ही गंभीर बाब आयुक्तांच्या नजरेसमोर आणून दिली.