गणेशोत्सवाच्या काळात शिस्त सुरक्षा ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी माळीवाडा येथे बोलताना व्यक्त केले. माळीवाडा येथे श्री विशाल गणेश मंदिरामध्ये श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी विधिवत पूजा झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी विश्वस्त ऍडव्होकेट अभय आगरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.