पोलिसांच्या कामावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात मात्र वैराग पोलिसांनी एक अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे पोलिसांबद्दलचा आदर वाढला आहे. सोमवारी दुपारी ५ च्या हरवलेली सोन्याची पर्स अवघ्या २५ मिनिटांत शोधून तिला परत केली. विशेष म्हणजे, यासाठी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. रातंजन येथील विमल देशमुख या सोन्याची खरेदी करण्यासाठी वैरागमध्ये आल्या. त्यांनी ३० हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. मात्र,घाईगडबडीत सोन्याची पर्स हरवली, ती पोलिसांनी शोध घेऊन 25 मिनिटात परत केली आहे.