बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील स्त्रीरोग तज्ञ बोरले हॉस्पीटलमध्ये ३ सप्टेंबर रोजी १६ वर्षीय तरूणीला प्रसुतीकरीता आणण्यात आले होते. यावेळी तिच्या पतीकडे आधारकार्ड व इतर कागदपत्रांची मागणी केली असता प्रसुतीची वेळ जवळ असल्याने आधी प्रसुती करा आम्ही तोवर कागदपत्रे जमा करतो असे सांगितले. मात्र तिच्या पतीने दिलेल्या कागदपत्रांवरून सदर तरूणी अल्पवयीन असल्याचे निदर्शनात आले.