मोहफुलाची अवैधरीत्या दारू काढण्यासाठी सडवा मोहापास ची साठेबाजी केली असल्याच्या गोपनीय माहितीवरून कारधा पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका महिलेच्या ताब्यातून १८० किलो सडवा मोहापास जप्त केल्याची घटना घडली. ही घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारात घडली. या घटनेत कारधा पोलिसांनी नवेगाव कोका येथील एका ५५ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.