Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
खुलताबाद येथे २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या हजरत शेख मुन्तजबोद्दीन जरजरी बक्ष यांच्या ७३९ व्या उर्स महोत्सवाच्या पावित्र्यासह भाविकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित यंत्रणांना दिले. उर्स महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली.