वसई- विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रभाग निहाय प्रारूप प्रभाग रचना 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्याकरिता कालावधी देण्यात आला. महानगरपालिकेकडे एकूण 160 हरकती व सूचना प्राप्त झाले आहेत. या हरकतींमध्ये 10 मूळ हरकतींसोबत त्याच स्वरूपाचे 2130 रहिवाशांनी सामूहिकरित्या दाखल केलेल्या एका हरकतीचा समावेश आहे. या हरकतींवर सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी महानगरपालिकेमार्फत स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे.