कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रणित शिव विकास पॅनलचे 18 पैकी 17 संचालक निवडून आले आहेत,यामध्ये दोन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संचालकाचा समावेश आहे त्या दोन संचालकाचा आज दि.1 सप्टेंबर रोजी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे.याप्रसंगी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .