आगामी गणेशोत्सव, पोळा, ईद-ए-मिलाद आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे धुळे दौऱ्यावर आले. पोलिस अधीक्षक कार्यालयात माध्यमांशी बोलताना त्यांनी सण-उत्सव शांततेत व सामाजिक सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वा अफवा पसरवू नयेत, असेही त्यांनी सांगितले. ईद-ए-मिलाद मिरवणूक सामंजस्याने पुढे ढकलल्याबद्दल मुस्लिम बांधवांचे त्यांनी विशेष कौतुक केले.