हिंगणघाट तालुक्यात सततच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर आणि कापूस या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांवर येलो मोझायक, मूळ कुज यांसारखे रोग येऊन शेंगा रिकाम्या पडल्या आहेत, तर अनेक ठिकाणी पिकेच सुकून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.या पार्श्वभूमीवर सावली (वाघ) सर्कलमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री तथा जिल्हा प्रशासनाकडे लेखी अर्ज करून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.