भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात पहाटे चाकण एमआयडीसी मध्ये एन्डुरन्स चौक येथे घडला.तुफान दिलीप मोंडळ वय वर्षे पंचवीस मूळ राहणार पश्चिम बंगाल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एमएच 14 एलएक्स 9328 या क्रमांकाच्या ट्रकवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.