अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल व शहर पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांची बदली करण्यात आली आहे.