रामटेक शहराच्या बायपास रोड वरील नागारा तलावात रविवार दिनांक 31 ऑगस्टला सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान एका वृद्ध अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी फिरण्यास जाणाऱ्याना हा मृतदेह आढळून आला. बार्टीचे समता दूत राजेश राठोड यांनी जागृत नागरिकाचे कर्तव्य पार पाडत ठाणेदार रवींद्र मानकर यांना फोनवरून याची सूचना दिली. मृतकाचे वय अंदाजे 75 ते 80 वर्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.