राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे याबाबत खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली असताना देखील महाविकास आघाडी याबाबत राजकारण करत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आराध्य दैवत आहे व त्यांना घेऊन राजकारण महाविकास आघाडी करत आहे याबद्दल आज दि.1 सप्टेंबर रोजी दु.12.30 वा.भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला