राहता तालुक्यातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर बाभळेश्वर हद्दीमध्ये दोन ट्रकचा अपघात झाला, त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. महामार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे, त्यातच रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांची संख्या वाढतीय. आज अपघातामुळे वाहतूक संथगतीने सुरू राहिल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय.