वाशी तालुक्यातील बोरी-इसरूप-खानापूर या एकत्रित ग्रामपंचायतीत महिलांची विशेष सभा घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात करण्यात आली. या वेळी महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. कार्यक्रमास ग्रामसेवक डि. एस. सरवदे, ऑपरेटर सुनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्या उज्वलाताई पाटील, केंद्र प्रमुख मोहीते सर, मुख्याध्यापक पटेल सर, कर्मचारी छत्रे भैया, तसेच बचत गटांच्या ताई, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या हजर होत्या.