खेड तालुक्यातील संघलट येथील बीएसएनएल टॉवरच्या बंद रूममध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. गोवा येथील वेदांत कंपनीचे कर्मचारी १५ जुलै रोजी टॉवरचे साहित्य बसविण्यासाठी संघलट येथे आले होते. त्यांनी आवश्यक साहित्य बीएसएनएल टॉवरच्या बंद रूममध्ये ठेवले होते. मात्र, १९ ऑगस्ट रोजी संदीप देसाई यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, दरम्यानच्या कालावधीत कोणीतरी लॉक तोडून आत प्रवेश करून साहित्य चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.