साकोलीतील सिव्हिल वार्डातील प्रकाशपर्व येथे कोहळी समाजातर्फे सभेचे आयोजन कोहळी समाज विकास मंडळ नागपूरचे अध्यक्ष प्रकाश बाळबुध्देंच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.24आँगष्टला दुपारी12ते दुपारी4 या वेळात करण्यात आले. नागपूर येथे समाज भवन व विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृह बांधण्याच्या बाबतीत व सामुहिक विवाह सोहळा सुरू करण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली मा.आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते,डॉ. गजानन डोंगरवार,मंडळाचे उपाध्यक्ष अमोल मुंगमोडे,सचिव माणिक लोथे सहसचिव डॉ.राजेश कापगते,डॉ.छाया कापगते उपस्थित होते