परळी शहरात ६ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात मुकमोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा बुधवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लक्ष्मी टॉवर येथून सुरू झाला आणि रेल्वे स्टेशनपर्यंत नेण्यात आला.मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी संताप व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.या मोर्च्यामुळे शहरात काही काळ वातावरण गंभीर झाले होते.