सणाच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राहावी व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दहेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमधील ३० दारू विक्रेत्यांवर २१ ते २४ ऑगस्टपर्यंत गावातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोळा सण असल्याकारणाने शांतता राहावी याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती ता. २२ शुक्रवारला सकाळी १०.३० वाजता दहेगाव पोलिसांकडून प्राप्त झाली.