श्रीगोदा मध्ये ठेकेदाराकडून ७ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माजी अभियंता पाचनकर यांच्यावर एसीबीचा गुन्हा. पंचायत समिती अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले अभियंता प्रकाश पाचनकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदाराकडून ७ हजार रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार, पाचनकर हे सेवेत असताना बांधकाम ठेकेदार पुरी यांच्याकडे मोबाईल फोनवरून लाच मागणी केली होती.