रत्नागिरी शहरा जवले उत्कर्ष नगर वैभव सोसायटी कुवारबाव येथील रहिवासी असलेले संजय वर्तक यांच्या घरी सलग १७ व्या वर्षी पर्यावरण पूरक गणपती बाप्पा साकारण्यात आले आहेत. या वर्षी वर्तक कुटुंबीयांनी शासकीय शालेय इमारतींची असलेली दुरावस्था देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला असून या शाळा दुरुस्तीसाठी आव्हान या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.