राज्यातील प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी 7 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसांची ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे घेतला. या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणार्या कर्मचारी व अधिकार्यांना आज शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानित केले.