अमळनेर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये आणि शेतीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी रविवारी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तालुक्यातील कळमसरे गावाला भेट दिली. त्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.