महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ जी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या नेर तालुका प्रमुख पदी मनोज नाल्हे यांची निवड करण्यात आली.तालुकाप्रमुख या पदावर असताना उत्कृष्ठ काम करून त्यांनी मागील वर्षात शिवसेनेचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढविले होते.पुन्हा एकदा त्यांची तालुका प्रमुख या पदावर निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केल्या जात आहे.