गोंदिया जिल्हा पोलीस विभाग, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन व गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचे आयोजन आमगाव येथे करण्यात आले. या मोहिमेत मोठ्या संख्येने विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी सहभागी झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम सांगून युवकांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले.