तालुक्यातील मध्यभागी असलेल्या मौजा मांढळ येथील शिव व हनुमान मंदिर येथे मूर्तींची प्राणप्रतिष्ठा निमित्त गावातील मुख्य रस्त्याने मूर्ती फिरवून मिरवणूक काढण्यात आली. याबाबत चे वृत्त असे की शिव व हनुमान मंदिर मांढळ येथे मूर्तींची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. वैदिक पध्द्तीने भगवान शिव लिंगपिंड,नंदी, गणपती, नागदेवता,व माता अन्नपूर्णा ची प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन महाआरती करण्यात आली. यावेळी महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी गावातील भाविक व मान्यवर उपस्थित होते.