धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती झरेबांबर येथे बुधवार दिनांक 14 मे रोजी संध्याकाळी सात वाजता शिवप्रेमींच्या उपस्थितीत उत्साहात साजरी झाली. झरेबांबर येथे संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच पारगड येथून शिवज्योत आणण्यात आली. नंतर विराट रॅली देखील काढण्यात आली. संध्याकाळी ढोल पथक देखील आयोजन करण्यात आले होते. शिवप्रेमींच्या उपस्थितीत उत्साहात संभाजी महाराजांची जयंती साजरी झाली.