दहिवडी, ता. माण येथे बाजार पंटागणावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात जाहीर प्रवेश रविवारी दुपारी ४ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, खासदार नितीन काका पाटील, अजित दादा गटाचे नेते अॅङ उदयसिंह उंडाळकर, पिंटूशेठ मांडवे, जिल्हा बँकेचे संचालक राजूशेठ राजपूरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.