हिंगोली नांदेड यातील 61 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर जामगव्हाण ते भाटेगाव दरम्यान असलेल्या भाटेगाव शहरातील धोकादायक वळणावर 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी कळंबोलीतील फळ विक्रेते शे .तोखीर मो गौस हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची माहिती आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झाली,पंधरा दिवसातील अपघातातील मृत्यूची हे तिसरी घटना असल्याची माहिती आहे.जामगाव ते भाटेगाव दरम्यान कालव्यावरील पूल अरुंद असल्याने या ठिकाणचे अपघात घडत आहेत .