भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी शुक्रवारी दुपारी ४.२३ च्या सुमारास सामनाच्या अग्रलेखाला उत्तर देताना संजय राऊत यांच्यावर टीका केली. कुलकर्णी म्हणाले की, २०१४ पासून हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतो. १४० कोटी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार कोणी केला, कुणाचे खासदार फुटले आणि कोणी क्रॉस व्होटिंग केले, याचे आत्मपरीक्षण राऊत यांनी करावे, मग आम्हाला शहाणपण शिकवावे.