बजाज कृषी महाविद्यालय, पिंपरी (मेघे) च्या कृषीकन्यांनी ग्रामीण लघु कार्यक्रमाच्या अंतर्गत ता. 25 सोमवारला सकाळी 11.30 वाजता धानोरा येथे सहभागी ग्रामीण मूल्यमापन व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनीचे उद्घाटन महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. रा. खर्चे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैभव गिरी, वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक चहांदे यांची उपस्थिती होती.