उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या विश्वशांती बौद्ध विहाराचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते गेल्या वर्षी लोकार्पण सोहळा पार पडला,बौद्ध विहाराचे लोकार्पण होऊन वर्ष उलटला नाही तर बौद्ध विहारला तडे गेले,गळती लागल्याने समाज बांधवांनी संताप व्यक्त करीत आहेत, बौध्द विहाराचे निकृष्ट काम करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन २६ ऑगस्ट रोजी समाज बांधवांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक गजानन सताळकर यांनी माध्यमासमोर बोलताना दिली आहे.