कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची जागा कोणत्या घटक पक्षाला मिळणार हे महत्त्वाचे नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिकाने विजय होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी केले. सरवडे तालुका राधानगरी येथे आयोजित केलेल्या राधानगरी भुदरगड तालुक्यातील बूथ प्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.