माजी मंत्री आमदार डॉ.राजे धर्मरावबाबा आत्राम तसेच सीनेट मेंबर तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांना थायलंड येथून आणलेले बुद्धमूर्तीचे स्वरूप भेट देण्यात आले.या प्रसंगी आदिवासी मुलांना परदेशी शिक्षणासाठी उपलब्ध होणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भात सविस्तर चर्चा झाली. विशेषतः मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लागणारा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने कसा राबवता येईल, याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.