भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या "स्मार्ट बसेस" घेण्यात येणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडा विधानसभेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिनांक 15 मे रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत नव्या 3 हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बस बांधणी कंपन्यांची बैठक पार पाडली.