सातारा शहरातील सदरबाजार भाग हा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्या भागात एका घरात चोरीची घटना घडली असून त्याचा सीसीटीव्ही फुटेज गुरुवारी सकाळी १० वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दुपारी २ वाजेपर्यंत झालेली नव्हती. दरम्यान, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरातील साहित्य विस्कटलेले दिसत आहे.