माढा तालुक्यातील अंबाड हॉटेलच्या बाजूच्या खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर करमाळा पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख ५४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ७ जणांवर कारवाई केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सनी रावसाहेब सातव (वय ३४, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, करमाळा) यांनी कुडूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.