आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गणेश कृषी केंद्र येथे भाजप नेते तथा गोंदिया जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक रेखलाल टेंभरे यांच्या जन्मदिनानिमित्त गणेश कृषी केंद्र येथील आवारात सुंदर कांड कार्यक्रम व रामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोरेगाव नगरपंचायत चे माजी बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन, प्रगतिशील शेतकरी फणींद्र हरीणखेडे राष्ट्रवादीचे नेते विनोद रंहागडाले, पल्लवी मेडिकलचे संचालक चंद्रशेखर बघेले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.